News

'रोहन'च्या २ पुस्तकांना राज्य शासन पुरस्कार जाहिर !

दि. १४/३/२०१३ रोजी रोहन प्रकाशनाच्या २ पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासन उतकृष्ठ वाड्मय पुरस्कार जाहिर करण्यात आले.

श्री. मिलींद चंपानेरकर यांना सर्वोत्तम अनुवादकाचा ’तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ "लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र" या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहिर झाला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

"लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

तसेच श्री. प्रफूल्ल कदम यांना पर्पावरण गटातला ’डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार ’सुरुवात एका सुरुवातिची’ या पुस्तकासठी जाहिर झाला. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

"सुरुवात एका सुरुवातिची" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

असा घडला भारत प्रकाशित !

दि. २२/०१/२०१३ ला "असा घडला भारत" या महाग्रंथाचे प्रकाशन, टाईम्स ओफ ईंडियाचे माझी संपादक व विचारवंत श्री. दिलिप पाडगावकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ संपादक श्री. कुमार केतकर व इतिहासाचे संशोधक श्री. सुहास पळशिकर होते.

पाडगावकरांनी सांगितले की, या ग्रंथात भारतातील लोकशाहीचा प्रवास तर नोंदवला आहेच, पण त्या पलीकडे या देशातील प्रजासत्ताक समजून घेण्यासाठी हा ग्रंथ अतिशय मूल्यवान ठरेल. अशा प्रकारचे काम भारतातल्या इतर कुठल्याच भाषेत झालेले नसल्याचे सांगून ते म्हणाले की, या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद होणे आवश्यक आहे.

जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतातील समकालीन इतिहासाकडे बघण्याची गरज असल्याचे सांगून कुमार केतकर म्हणाले की, या ग्रंथाच्या माध्यमातून ही दृष्टी मिळण्याचा वाचकाचा प्रवास सुरू होऊ शकतो. ते म्हणाले, ‘‘या ग्रंथात स्वातंत्र्योत्तर भारतातील घडामोडींसंबंधी दीर्घ लेख, नोंदी, टीपणं आदींची रचना विचारसरणीचे झापड लावून केलेली नाही. तटस्थ भूमिकेतून केलेल्या या विश्लेषक नोंदी पत्रकार, अभ्यासक आदींना संदर्भ म्हणून उपयोगी पडतील. वर्तमानपत्रातली बातमी वाचताना त्यामागील ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ समजून घेणे किती आवश्यक आहे ते या ग्रंथातून वाचकाच्या ध्यानात येते.’’

सुहास पळशीकर यांनी ग्रंथाचे संपादक सुहास कुलकर्णी व मिलिंद चंपानेरकर यांचे कौतुक करताना सांगितले की, ‘संपादकीय कौशल्याचा नमुना म्हणून या ग्रंथाकडे पाहता येईल. पन्नासहून अधिक लेखकांच्या साहाय्याने हा ग्रंथ सिद्ध झाला असला तरी तो एकसंध शैलीचा अनुभव वाचकाला देतो.’ स्वातंत्र्योत्तर भारताचा संस्थात्मक पातळीवरचा आणि नागरिक म्हणून व्यक्तींच्या पातळीवरचा इतिहास या ग्रंथातून समोर येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

"असा घडला भारत" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

महाराष्ट्र टाईम्स मध्ये "असा घडला भारत" या महाग्रंथाविषयी बातमी ...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/18194490.cms

सकाळ मध्ये "असा घडला भारत" या महाग्रंथाविषयी बातमी ...
http://online3.esakal.com/esakal/20130121/5159860767124635627.htm

एबीपी माझा चॅनलवरची बातमी ...
http://abpmajha.newsbullet.in/videos/maharashtra/24768-2013-01-21-16-23-54

‘रोहन प्रकाशन’ला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा प्रथम पुरस्कार

गेल्या अनेक वर्षांपासून ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स,’ (एफ.आय.पी.) दिल्ली या पुस्तक प्रकाशकांच्या शिखर परिषदेतर्फे प्रकाशकांना ‘एक्सलन्स इन बुक प्रॉडक्शन’ हे उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठीचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. २०११-२०१२ यावर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी देण्यात येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. त्यात ‘रोहन प्रकाशन’च्या ‘१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’ या पुस्तकाची प्रथम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार राष्ट्रीय स्तरावरचा असून या पुस्तकाची निवड सर्व प्रादेशिक भाषांतील पुस्तकांमधून झाली आहे. प्राचीन भारतीय खाद्यसंस्कृतीविषयीच्या या पुस्तकाचं डॉ. वर्षा जोशी आणि डॉ. हेमा क्षीरसागर यांनी सहलेखन केलं आहे. पुस्तकाची मांडणी व डिझाइन संकल्पना प्रदीप चंपानेरकर यांची असून पुस्तकाचं मुखपृष्ठ व आतील चित्रं सुप्रसिद्ध चित्रकार राहुल देशपांडे यांनी रेखाटली आहेत. ‘रोहन प्रकाशन’ने विषयाला अनुसरून केलेली पुस्तकाची निर्मिती उच्च अभिरुचीसंपन्नही आहे. यापूर्वीही रोहन प्रकाशनाला उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
पुरस्कारप्रदान कार्यक्रम दिल्ली येथे प्रगती मैदानावर ७ सप्टेंबर १२ रोजी संपन्न झाला.

’१२व्या शतकातील खाद्यसंस्कृती’ या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

आपटे वाचनालय पुरस्कार प्राप्त!

श्री. मिलींद चंपानेरकर यांना सर्वोत्तम अनुवादकाचा पुरस्कार "लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र" या पुस्तकाच्या अनुवादासाठी देण्यात आला. हे पुस्तक लोकप्रिय चित्रपट दिर्दशक सईद मिर्झा यांचे अत्मचरित्र.

"लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र" या पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा...

Page 2 of 2

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue