अन्फर्गेटेबल जगजित सिंग । Unforgetable Jagjeet Singh

Offer Price

200.00 INR
250.00 INR

अन्फर्गेटेबल जगजित सिंग । Unforgetable Jagjeet Singh

सत्या सरन

अनुवाद :

उल्का राऊत

Specifications

  • जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे...मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला.

    सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले.
    एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा...अन्फर्गेटेबल जगजित सिंग.

  • Book: Unforgetable Jagjeet Singh
  • ISBN: 978-93-89458-33-6
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, चरित्रपर / Biographical
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Jagjeet Singh, Biography, Chitra Singh, Music, Gazal, Singer